‘आरोग्यम् धनसंपदा’

‘आरोग्यम् धनसंपदा’

 

आपण लहानपणापासून ‘आरोग्यम् धनसंपदा’, ‘आरोग्य हीच खरी संपत्ती आहे’ हे नेहमीच ऐकतो.आजच्या धकाधकीच्या जीवनात स्वत:च्या आरोग्याबाबत जागरूक असणे प्रत्येकालाच आवश्यक आहे आणि त्या साठी आपल्याला आजार होण्याआधी त्यावर प्रतिबंध करणे गरजेचे आहे.

 

बदलत्या जीवनशैलीमुळे आज आरोग्याच्या अनेक समस्या उभ्या राहत आहेत. म्हणूनच व्यायामाला आपल्या दैनंदिन आयुष्याचा भाग बनवायला हवं. रोजच्या रोज व्यायाम केल्यामुळे स्टॅमिना वाढतो, ताकद वाढते. महत्त्वाचंम्हणजे शरीर लवचिक बनतं. तसंच, वजन नियंत्रणात राहतं.शरीर आणि मन यांचं आरोग्य एकमेकांशी निगडित असतं. थोडीशी पाठ, कंबर, डोकेदुखी याकडे दुर्लक्ष केलं तर नकळत चिडचिड वाढते, म्हणून दोघांकडे लक्ष देणं महत्त्वाचं ठरतं.

 

दैनंदिन जेवणात स्निग्ध पदार्थ, खनिज इत्यादी घटक तत्त्वांनी युक्त सकस व संतुलीत नियमित पुरेसा आणि ताजा आहार व्यक्तीला मिळाल्यास आरोग्य लाभते. आहारावर आरोग्य विषयक स्थिती अवलंबून असते.व्यक्तीच्या खाण्यापिण्यामध्ये स्वच्छता, स्वच्छतेमुळे आरोग्याला पोषक स्थिती निर्माण होते. अस्वच्छतेमधून मलेरिया, गास्ट्रो इत्यादी सारखे रोग उदभवतात. वैयक्तिक व सार्वजनिक पातळीवर व्यक्तीने स्वच्छतेची काळजी घेतली पाहिजे. ज्यामुळे आरोग्य चांगले राहते.

 

शारीरिकरित्या तुम्ही अॅक्टिव्ह असण्याचा फायदा म्हणजे हृदयाचं कामकाज सुरळीत सुरू राहतं. यामुळे ब्लड प्रेशर, कोलेस्टोरॉलचा त्रास कमी होतो. तसंच डायबीटीसवरही नियंत्रण राहतं. तसंच राग, वैताग, चिडचिड, नैराश्य आणि अस्वस्थता यासारख्या समस्यांवरही नियंत्रण मिळवणंशक्य होतं.

 

सध्या यांत्रिकी उपकरणामुळे शारिरीक कष्ट कमी होत चालले आहेत. कपडे धुणे, भांडी घासणे, पिठ मळणे, दळणे, कुटणे ही कामे यंत्रच करीत आहेत. त्यामुळे स्त्रियांमध्ये लठ्ठपणाची समस्या उद्भवत आहे. त्यातून अनेक रोगांना निमंत्रण मिळत आहे. विज्ञानाने भौतिक सुख माणसाला दिले आहे. पण त्यामुळे काही अंशी शारिरीक आणि मानसिक स्वास्थ हरविले आहे. नोकरी करत असतांना मानसिक समाधान असणे अत्यंत गरजेचे आहे. मानसिक स्थिती व कामावरील वातावरण याचा देखील आरोग्यावर परिणाम होत असतो. म्हणून आनंदी वातावरणात काम केल्याने उत्साह वाढतो व कार्यक्षमता सुद्धा वाढण्यास मदत होते. मनोरंजनातून व्यक्तीला आनंद मिळतो. मानसिक स्वास्थ लाभते. जीवन सुखी समाधानी बनते. व्यक्ती जेव्हा उदासिन बनतो, तेव्हा तो मनोरंजनाचा आधार घेतो. सुयोग्य मनोरंजनामुळे व्यक्तीला शारीरिक, मानसिक स्वास्थ लाभते.

 

तुम्ही आजारी पडत नाही, याचा अर्थ तुम्ही हेल्दी आहात, असा होत नाही. तर दैनंदिन घडामोडी तुम्ही किती अॅक्टिव्हली पार पाडता, यावर तुमचं आरोग्य अवलंबून असतं. उदा. वजन कमी करणं, फिट राहणं, धाप न लागता जिने चढणं, ताण न येणं, खाण्याच्या योग्य सवयी. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं नाही अशी येत असतील, तर अर्थातच तुम्ही फिट नाही हे लक्षात घ्या. त्यामुळे वेळेतच आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याकडे लक्ष द्या

 

शरीर व मन निरोगी असणे ही व्यक्तीच्या दृष्टीने चांगले समजले जाते. कोणत्याही प्रकारचा वैद्यकीय उपचार न घेता व्यक्ती आपले जीवन जगाते. तिच व्यक्ती खऱ्या अर्थाने सर्व बाबतींमध्ये श्रीमंत असते. ज्या व्यक्तीजवळ खूप पैसा आहे व त्यास रोगाने जर जर केले तर अशा व्यक्तीस जीवन जगणे कठीण जातेएखादी व्यक्ती जर निरोगी असेल तर संपूर्ण समाज सुद्धा निरोगी असावा लागतो. पण सर्व समाजामधील माणसे हे या ना त्या रोगाने आजारी पडलेले असतात. त्यामुळेच देशाच्या सर्वांगीण प्रगतीवर यांचा परिणाम पडतो. ज्या देशातील समाज हा निरोगी असतो तो देश हा प्रगतीचा शेवटच्या बिंदूवर जावून पोहोचतो म्हणून या सर्व बाबींसाठी आरोग्य महत्त्वाचे असते. म्हणून दैनंदिन जीवनामध्ये आरोग्याला विशेष महत्त्व आहे व आपण त्याची काळजी घेतली पाहिजे.

 

आपण आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी म्हणजेच स्वत:साठी थोडासा वेळ काढला पाहिजे. आपण सर्वांनी संकल्प करू या तो नुसता संकल्प न ठेवता प्रत्यक्षात अंमलात आणू या. आरोग्य हे धन आहे आणि प्रत्येकाने शारिरीक, मानसिक आणि सामाजिक स्वास्थ चांगले राहण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. आरोग्य बिघडल्यावर सुधारत बसण्यापेक्षा, आरोग्य बिघडू नये म्हणून काळजी घेणे हे आपल्या प्रत्येकाच्या हातात आहे . म्हणतात ना “आपले आरोग्य आपल्या हाती” काळजी घ्या स्वत:ची.

Explore more: Fitness articles · Search all topics

Note: This article is for general information for families in India and is not a substitute for professional medical advice. Read our medical disclaimer.